Home माझं पिंपरी चिंचवड Bhosari News : पुणे जिल्ह्यात भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ; ४ लाख ६१ हजार ९३४ मतदार

Bhosari News : पुणे जिल्ह्यात भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ; ४ लाख ६१ हजार ९३४ मतदार

पुणे जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादीनुसार भोसरी विधानसभा मतदारसंघ सर्वांत मोठा ठरला आहे. भोसरीत ४ लाख ६१ हजार ९३४ मतदारांची नोंद झाली आहे.

by Admin
Spread the love

(पुणे, प्रतिनिधी ): मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेनंतर पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ६२ लाख १३ हजार ६९२ झाली असून, भोसरी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ ठरला(Bhosari Assembly) आहे.

 

प्रारूप मतदारयादीत भोसरी मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख ६१ हजार ९३४ मतदार आहेत. त्यानंतर चिंचवडमध्ये ४ लाख १७ हजार १५५, वडगाव शेरीमध्ये ३ लाख ९४ हजार १४०, खडकवासल्यात ३ लाख ९१ हजार २६३ आणि हडपसरमध्ये ३ लाख ५३ हजार १०९ मतदार(Bhosari Assembly) आहेत.

 

एसआयआरपूर्वीच्या मतदारयादीच्या तुलनेत तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसत नाहीत. दुबार नोंद, मृत्यू, स्थलांतर तसेच मतदार उपलब्ध नसणे आदी कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली (Bhosari Assembly) आहेत.

 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या माहितीनुसार, एसआयआर मोहिमेदरम्यान सुमारे १७ लाख ८३ हजार मतदार सापडले नाहीत. संबंधित मतदारांनी आवश्यक अर्ज दाखल न केल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. मात्र, त्यांना पुन्हा अर्ज करून मतदारयादीत नाव समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध (Bhosari Assembly)आहे.

 

दरम्यान, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे-हरकती आणि नव्याने होणाऱ्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रारूप यादीतील मतदारसंख्याच अंतिम मानता येणार नाही. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदारसंख्या स्पष्ट होणार (Bhosari Assembly) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00