Home आरोग्य Pavna Dam Updates:पवना धरण ६५.७१ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

Pavna Dam Updates:पवना धरण ६५.७१ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरण ६५.७१ टक्के भरले. पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा, सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग नाही.

by Admin
Spread the love

मावळ :सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी ७ वाजेपर्यंत पवना धरण ६५.७१ टक्के भरले असून, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात (Pavna Dam Updates)आहे.

धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ६०९.३६ मीटर (१९९९.२० फूट) इतकी नोंदविण्यात आली. धरणाची एकूण जलसाठा क्षमता १८९.५२ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १५८.३८ दशलक्ष घनमीटर (५५९४.४० दशलक्ष घनफूट) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा धरणाच्या एकूण क्षमतेच्या ६५.७१ टक्के इतका (Pavna Dam Updates)आहे.

गेल्या २४ तासांत धरण परिसरात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चालू पावसाळी हंगामात आतापर्यंत १९७ मिलिमीटर पर्जन्य झाला असून, वार्षिक एकूण पर्जन्यमान १४०५ मिलिमीटरपर्यंत पोहोचले(Pavna Dam Updates) आहे.

दरम्यान, सध्या पवना जलविद्युत केंद्र तसेच धरणाच्या सांडव्यातून कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत (Pavna Dam Updates)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00