पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, बीआरटीएस, आरोग्य, सायबर सुरक्षा तसेच प्रशासकीय सुविधांशी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात (Pcmc Standing Committee)आले.
पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उच्च क्षमतेच्या नव्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच बोपखेल, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, श्रीनगर, चिखली आणि जाधववाडी परिसरातील पाण्याच्या टाक्या, पंपिंग केंद्रे व वितरण वाहिन्यांच्या परिचालन आणि देखभालीची कामे एकात्मिक पद्धतीने करण्यात येणार (Pcmc Standing Committee)आहेत.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तसेच टँकर चालक उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे दैनंदिन व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा (Pcmc Standing Committee)आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या स्थापत्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, नाशिक फाटा ते वाकड या कॉरिडॉर क्रमांक ३ मधील रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे. औंध-रावेत बीआरटीएस मार्गाचे मूल्यमापन करून संबंधित बसथांब्यांचे आधुनिकीकरण करण्यासही मंजुरी देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिसरात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्रणा आणि अत्याधुनिक विद्युत कामे करण्यात येणार(Pcmc Standing Committee) आहेत.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच कान-नाक-घसा विभागातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या वार्षिक देखभालीस मुदतवाढ देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
महापालिकेच्या डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षेसाठी तीन हजार अँटी-व्हायरस परवाने घेण्यात येणार असून, तांत्रिक साहाय्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली(Pcmc Standing Committee) आहे.
महापालिकेच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या ‘लोहगड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कार्यालयात सभागृह, विविध विभागांसाठी कक्ष, कॅश काउंटर आणि अधिकाऱ्यांसाठी दालने विकसित करण्यात येणार (Pcmc Standing Committee)आहेत.
शहरात दोन लाख देशी वृक्षांची लागवड आणि डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी उद्यान विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांना तात्पुरती पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक १२ आणि १ मधील सार्वजनिक उत्सवांच्या व्यवस्थेसह ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ सात दिवस व्यापक स्वरूपात साजरे करण्यास मंजुरी देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा, सुरक्षित रस्ते, अद्ययावत आरोग्य सुविधा आणि सक्षम डिजिटल प्रशासन उपलब्ध करून देणे हे स्थायी समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी (Pcmc Standing Committee)सांगितले.
