Home प्रेरणा / यशकथा Women Journalists Association:महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब व देशाची प्रगती – उपमहापौर शर्मिला बाबर

Women Journalists Association:महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब व देशाची प्रगती – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरीत महिला पत्रकार संघाच्या स्नेह मेळाव्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब व देशाची प्रगती होते, असे प्रतिपादन Women Journalists Associationकेले.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : महिलांच्या त्याग, समर्पण आणि कष्टामुळेच कुटुंबाची तसेच देशाची प्रगती घडते. महिला दिन वर्षातून एकदाच साजरा करण्यापेक्षा महिलांना दररोज सन्मान आणि आदर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी (Women Journalists Association ) केले.

 

पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळावा व सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका, बचत गटांच्या अध्यक्षा, महिला पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात (Women Journalists Association)आला.

 

यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सारिका मासुळकर, शितल वर्णेकर, सुप्रिया चांदगुडे, वर्षा जगताप, अनुराधा गोरखे, शालिनी गुजर, अर्चना सस्ते, रवीना आंगोळकर, सुजाता बोराटे, स्नेहा कलाटे, तृप्ती कांबळे, शिवानी नरळे उपस्थित होत्या. तसेच महिला पत्रकार संघाच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, श्रद्धा प्रभुणे, सायली कुलकर्णी, माधुरी कोराड, मंदा बनसोडे, प्राजक्ता जाधव, श्रद्धा कोतवडेकर, लीना माने यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, अनिल कातळे, प्रवीण शिर्के, देवा भालके, सुनील (बाबू) कांबळे, अविनाश कांबीकर, विनय लोंढे, दिनेश दुधाळ, रोहित खर्गे,विवेक कुलकर्णी विशाल जाधव आदी उपस्थित (Women Journalists Association)होते.

 

कार्यक्रमाचे स्वागत अर्चना मेंगडे यांनी केले, सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले तर आभार श्रद्धा प्रभुणे यांनी (Women Journalists Association)मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00