Home आरोग्य Thergaon Cancer Hospital:अत्याधुनिक कॅन्सर उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात; थेरगाव प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी

Thergaon Cancer Hospital:अत्याधुनिक कॅन्सर उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात; थेरगाव प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलची अभिषेक बारणे यांनी पाहणी केली. सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि मोफत उपचार उपलब्ध होणार.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील रुग्णांना कर्करोगावरील दर्जेदार उपचार सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी थेरगाव येथे महानगरपालिकेकडून अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले जात आहे. या प्रकल्पाची प्रगती तपासण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी ३० एप्रिल रोजी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना (Thergaon Cancer Hospital) दिल्या.

 

पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील पार्किंग व्यवस्था, सुरक्षा प्रणाली, ऑक्सिजन व पाणीपुरवठा यंत्रणा तसेच स्वच्छतेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कामाचा दर्जा टिकवून ठेवत प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात (Thergaon Cancer Hospital)आल्या.

 

या वेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. मुसलगी, डॉ. सोनेकर, डॉ. कुलकर्णी यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित (Thergaon Cancer Hospital)होते.

 

नवीन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून, लिनियर ॲक्सिलरेटर, ब्रॅकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनर यांसारखी महत्त्वाची उपकरणे बसवली जाणार आहेत. येथे स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर विशेष उपचार केले जातील. यासोबतच केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, समुपदेशन आणि पुनर्वसन या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध (Thergaon Cancer Hospital)असतील.

 

या रुग्णालयातील उपचार ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांशी जोडले जाणार असल्यामुळे गरजू रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात सेवा मिळणार (Thergaon Cancer Hospital)आहे.

 

या दौऱ्यादरम्यान थेरगाव रुग्णालयात दीर्घकाळ सेवा बजावणारे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांचा सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात (Thergaon Cancer Hospital)आला.

 

याबाबत बोलताना अभिषेक बारणे म्हणाले, “कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचार अत्यंत खर्चिक असतात. त्यामुळे सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. थेरगाव येथे उभारण्यात येणारे हे अत्याधुनिक हॉस्पिटल या समस्येवर महत्त्वपूर्ण उपाय ठरेल. आमचे उद्दिष्ट एकही रुग्ण पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हेच (Thergaon Cancer Hospital)आहे.”

 

या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार(Thergaon Cancer Hospital) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00