पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर Secondary एडुकेशन (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) यांच्याकडून फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शनीवार, 2मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची अधिकृत घोषणा सकाळी ११.०० वाजता करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली (Hsc Result 2026) आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर करण्यापूर्वी शनिवार, २ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत निकालासंबंधी सविस्तर माहिती दिली जाणार(Hsc Result 2026) आहे.
विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून, अधिकृत संकेतस्थळांवर तो उपलब्ध करून दिला जाईल. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागले (Hsc Result 2026)आहे.
