Home प्रेरणा / यशकथा Shivaji Maharaj books:शिवाजी महाराजांवरील ५५१ पुस्तकांच्या संग्रहासाठी संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Shivaji Maharaj books:शिवाजी महाराजांवरील ५५१ पुस्तकांच्या संग्रहासाठी संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

९ भाषांतील ५५१ पुस्तकांचा अनोखा संग्रह; शिवप्रेमींसाठी थेरगाव येथे खुला

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : थेरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील ९ भाषांतील ५५१ पुस्तकांचा दुर्मिळ संग्रह करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २५ मार्च २०२६ रोजी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात (Shivaji Maharaj books)आले.

 

बारणे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती आणि सिंधी भाषांतील विविध लेखकांची पुस्तके संकलित केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील असा बहुभाषिक पुस्तकसंग्रह करणारे ते एकमेव असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आण्णासाहेब मगर सांस्कृतिक फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद खामकर, गीतकार बाळासाहेब भालेराव उपस्थित (Shivaji Maharaj books)  होते.

 

याशिवाय बारणे यांच्याकडे शिवरायांच्या विविध धातूंतील ७० हून अधिक मूर्ती तसेच केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या शिवरायांवरील सुमारे १५०० नाण्यांचा संग्रह आहे. हा संग्रह थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात नागरिकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुला असून संशोधकांना संदर्भासाठी पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली (Shivaji Maharaj books) जातात.

 

यापूर्वीही त्यांनी १९७८ ते २०२२ या कालावधीतील पिंपरी-चिंचवडमधील आजी-माजी नगरसेवकांच्या १२०० व्हिजिटिंग कार्ड्सच्या संग्रहाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली(Shivaji Maharaj books)  आहे.

 

शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले बारणे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद आहेत. त्यांच्या संपादनातील ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकतेच झाले, अशी माहिती गोविंद खामकर यांनी (Shivaji Maharaj books) दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00