Home तंत्रज्ञान Vallabhnagar Bus Stand :वल्लभनगर बसस्थानक पुनर्विकासावर आमदार प्रताप सरनाईक नाराज; कामाला गती देण्याचे आदेश

Vallabhnagar Bus Stand :वल्लभनगर बसस्थानक पुनर्विकासावर आमदार प्रताप सरनाईक नाराज; कामाला गती देण्याचे आदेश

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील महत्त्वाच्या वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम संथ गतीने सुरू असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामातील विलंब आणि दर्जाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना (Vallabhnagar bus stand) दिल्या.

 

पाहणीदरम्यान त्यांनी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था यांची तपासणी केली. उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी (Vallabhnagar bus stand)दिले.

 

पावसाळ्यापूर्वी बसस्थानकाची इमारत व आवारातील काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे आदेश देत कामाचा वेग वाढवण्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा प्रवाशांना चिखल व पाण्याचा त्रास सहन करावा लागेल, अशी त्यांनी सूचना (Vallabhnagar bus stand) केली.

 

या वेळी राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते. बसस्थानकात आधुनिक सुविधा, डिजिटल डिस्प्ले आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणीही स्थानिकांनी केली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरनाईक यांनी(Vallabhnagar bus stand) दिला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00