Home आरोग्य Reshma Katale:प्रभाग १६ मध्ये धोकादायक ठिकाणी गतिरोधकांची मागणी; नगरसेविका रेश्मा कातळे यांचे प्रशासनाला निर्देश

Reshma Katale:प्रभाग १६ मध्ये धोकादायक ठिकाणी गतिरोधकांची मागणी; नगरसेविका रेश्मा कातळे यांचे प्रशासनाला निर्देश

रावेत परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १६ मध्ये धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक व सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याचे नगरसेविका रेश्मा कातळे यांचे प्रशासनाला निर्देश.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील काही रस्ते अपघातप्रवण ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात रविंद्र लातुरे यांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका रेश्मा कातळे यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले (Reshma Katale) आहेत.

 

कातळे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. विशेषतः स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावणे आणि इतर सुरक्षा उपाय तत्काळ अमलात आणावेत, असे त्यांनी(Reshma Katale) सांगितले.

 

स्थानिक नागरिकांनीही काही भागांत वाहनचालकांकडून वेगमर्यादा पाळली जात नसल्याची तक्रार केली आहे. सोसायटीसमोरील रस्ते, शाळा परिसर, रावेत-किवळे मार्ग आणि विविध चौकांमध्ये अपघाताचा धोका वाढल्याने या ठिकाणी विशेष उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली(Reshma Katale) आहे.

दरम्यान, कातळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर प्रत्यक्ष पाहणी करून कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली (Reshma Katale)आहे.

 

या निर्णयाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून परिसरातील सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात येत(Reshma Katale) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00