पिंपरी (दि. १ मे २०२६) : कामगार साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात हा सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात उद्योजक भगवान पठारे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे कृषी-उद्योग जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात (Narayan Surve Award) आला.
तसेच प्राचार्य शंकर देवरे (भला माणूस सन्मान), अरुण गराडे (जन्मशताब्दी सन्मान), संगीता झिंजुरके (काव्यप्रतिभा पुरस्कार) आणि डॉ. स्वाती पाटील व नीलेश शेंबेकर (साहित्य पुरस्कार) यांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात(Narayan Surve Award) आले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे ३४ वी श्रम-उद्योग परिषद व उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. राजा दीक्षित यांनी भूषवले, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित (Narayan Surve Award) होते.
या प्रसंगी शवविच्छेदन मजूर मितेश डूळगज, स्मशानभूमी सेवक प्रशांत बराटे, मोलकरीण कल्पना कदम, पीठगिरणी कामगार मनोजकुमार राम आणि सफाई कामगार प्रवीण बागूल या उपेक्षित कष्टकऱ्यांचाही सन्मान करण्यात (Narayan Surve Award) आला.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात शारीरिक श्रमाला समाजात दुय्यम स्थान दिले जाते, अशा पार्श्वभूमीवर कष्टकऱ्यांचा सन्मान महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मनोहर पारळकर यांनी कामगार, महिला आणि कष्टकरी यांच्या योगदानामुळे समाज सुरळीत चालतो, असे मत व्यक्त (Narayan Surve Award) केले.
सन्मानाला उत्तर देताना नीता सातपुते यांनी विनामूल्य योग प्रशिक्षण आणि गरजू महिलांना आधार देताना मिळणारा आनंद व्यक्त केला. भगवान पठारे यांनी कृषी प्रकल्पांच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे (Narayan Surve Award) सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र वाघ यांनी सादर केलेल्या ‘डोंगरी शेत माझं…’ या कवितेने झाली. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकात सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती दिली. संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे आणि कुमार खोंद्रे यांनी काव्य सादरीकरण (Narayan Surve Award) केले.
प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र वाघ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी इंद्रजित पाटोळे, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, राजू जाधव, स्वाती भोसले आणि प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य (Narayan Surve Award) केले.
