पिंपरी, दि. ०६ एप्रिल २०२६: नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर महापालिका भर देत असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी (PCMC Amenity Space) केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील गट क्रमांक २३० व २३१ मध्ये विकसित होणाऱ्या अॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार(PCMC Amenity Space) आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली(PCMC Amenity Space) आहे.
या अॅमेनिटी स्पेसमध्ये व्हॉलीबॉल कोर्ट, योगा कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, सॅन्ड पिट, बहुउद्देशीय मैदान, अम्फीथिएटर, पादचारी मार्ग, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग अशा विविध सुविधा उभारण्यात येणार(PCMC Amenity Space) आहेत.
या सुविधांमुळे स्थानिक नागरिकांना व्यायाम, क्रीडा आणि विरंगुळ्यासाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून परिसरात आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार(PCMC Amenity Space) आहे.
