पिंपरी : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत चार महिन्यांपासून फरार असलेल्या चार आरोपींना बिहार राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ६० हजार रुपये (Mahalunge MIDC Police)आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निक्कुकुमार देवकी सिंह (वय २२), रंजनकुमार देवकी सिंह (वय २०), राजकुमार उर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९) आणि डिंपल पटेल विनोद सिंह (वय २५, सर्व रा. बिहार) अशी(Mahalunge MIDC Police) आहेत.
मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील रहिवासी कविता मदन कड यांच्या बंद घराचे शटर व कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरी करून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी बिहारमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारमध्ये जाऊन सापळा रचत चारही आरोपींना अटक (Mahalunge MIDC Police)केली.
आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे १२ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.
ही कारवाई उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राज कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ कार्यालयातील सहाय्यक फौजदार तुकाराम घुगे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करीत (Mahalunge MIDC Police)आहेत.
