Home पुणे Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशी 2026 आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; इंद्रायणी घाट बंद

Ashadhi Ekadashi:आषाढी एकादशी 2026 आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; इंद्रायणी घाट बंद

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढल्याने घाटांवर प्रवेश बंद करण्यात आला.

by Admin
Spread the love

आळंदी (पुणे) : वारकरी संप्रदायातली सर्वात श्रेष्ठ मानली जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुक्रवारी (२५ जुलै) पहाटेपासूनच आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकरी आणि भाविकांमुळे संपूर्ण आळंदी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन (Ashadhi Ekadashi)निघाली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांसह श्री सिद्धेश्वर महाराजांचेही दर्शन घेतले. मंदिर परिसरात भाविकांसाठी उपवासाची खिचडी तसेच फळांचे वाटप करण्यात आले. आजानबाग परिसरात अनेक वारकरी पारायणात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला(Ashadhi Ekadashi) मिळाले.

विविध भागांतून आलेल्या दिंड्या टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात मंदिरात दाखल होत होत्या. काही भाविक मंदिर परिसरात पारंपरिक फुगड्यांचा आनंद घेताना दिसून आले. शहरभर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा काढली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या दिंड्या, त्यांची पारंपरिक वेशभूषा आणि त्यांनी सादर केलेले फुगडीचे खेळ भाविकांसाठी विशेष आकर्षण (Ashadhi Ekadashi)ठरले.

मंदिर परिसरातील हार-फुले, पूजासाहित्य तसेच वारकरी साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दिवसभर मोठी गर्दी होती. सायंकाळी श्रींच्या पालखीची हरिनामाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात नगरप्रदक्षिणा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण (Ashadhi Ekadashi)होते.

दरम्यान, मावळ तालुका, धरण परिसर आणि इतर भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीच्या दोन्ही घाटांवर नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी नदीघाट परिसरात तैनात करण्यात आले असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले (Ashadhi Ekadashi)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00