Home माझं पिंपरी चिंचवड Gaav Tas Changla book:गाव तसं चांगलं’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न होणार

Gaav Tas Changla book:गाव तसं चांगलं’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न होणार

दादाभाऊ गावडे लिखित ‘गाव तसं चांगलं’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात होणार असून डॉ. श्रीपाल सबनीस व उल्हासदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

by Admin
Spread the love

पुणे : ग्रामीण जीवन, संस्कृती आणि माणुसकीच्या नात्यांचा वेध घेणाऱ्या ‘गाव तसं चांगलं’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा लवकरच पुण्यात उत्साहात पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखक दादाभाऊ गावडे लिखित या ग्रंथाच्या प्रकाशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून साहित्यप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली (Gaav Tas Changla book)आहे.

 

या प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार राहणार (Gaav Tas Changla book)आहेत.

 

तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महापौर रवींद्र लांडगे, आमदार शंकरराव जगताप, महेशदादा लांडगे, बाबाजी काळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच ह.भ.प. चंद्रकांत वांजळे महाराज आणि प्रा. पांडुरंग गाडीलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार (Gaav Tas Changla book)आहेत.

 

या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी, मोझे पुर (ता. खेड, जि. पुणे), सकाळ प्रकाशन, इंद्रायणी साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड), कुलस्वामिनी प्रतिष्ठान, गाथा चिंतन परिवार तसेच गवाडे घराणे ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले (Gaav Tas Changla book)आहे.

 

ग्रामीण संस्कृतीचे वास्तव चित्रण आणि समाजमनाचा वेध घेणारा हा ग्रंथ वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्य, संस्कृती आणि समाज यांना जोडणारा हा सोहळा ठरणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले (Gaav Tas Changla book) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00