Home पुणे Ghazalvidha Sammelan :प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार | पुण्यात गझलविधा संमेलन संपन्न

Ghazalvidha Sammelan :प्रतिभा समाजासाठी वरदान तर कलावंतासाठी शाप : कौशल इनामदार | पुण्यात गझलविधा संमेलन संपन्न

पुण्यात आयोजित ‘गझलविधा’ गझल संमेलनात ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी साहित्य, गझल आणि प्रतिभेबाबत परखड मत व्यक्त केले. २५ हून अधिक गझलकारांचा सहभाग.

by Admin
Spread the love

पुणे : शब्दांमधून शब्दांपलीकडचे सांगण्याचे कार्य कवी करत असतात. त्यामुळे चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक आहे. प्रतिभावंतांची प्रतिभा ही समाजासाठी वरदान असली, तरी कलावंतासाठी ती शाप ठरते. लेखक, कवी किंवा गझलकाराने आपण का लिहितो, याचा परखड विचार केला तर तो लेखणी हातात घेतानाच दचकून जाईल. आजच्या साहित्यविश्वात हे दचकणे कमी झाले असून सादरीकरणाचे स्तोम अधिक माजलेले दिसते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त ( Ghazalvidha Sammelan) केले.

गझलविधा समूहातर्फे रविवारी (दि. १७) आयोजित एक दिवसीय ‘गझलविधा’ गझल संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे पार पडलेल्या या संमेलनात २५ हून अधिक गझलकारांनी सहभागGhazalvidha Sammelan) घेतला.

यावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, गझलविधा समूहाचे निमंत्रक भूषण कटककर, शाम खामकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर मंचावर उपस्थित Ghazalvidha Sammelan) होते.

प्रास्ताविकात शाम खामकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली, तर भूषण कटककर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त Ghazalvidha Sammelan) केले.

कौशल इनामदार म्हणाले, “कविता जशी व्यक्त होण्याची मुभा देते, तशीच अव्यक्त राहण्याची आणि काही गोष्टी लपविण्याचीही ताकद देते. फार कमी कलावंतांना खरी प्रतिभा लाभते. आज दु:खी गाणीही आक्रोशगीतांमध्ये परिवर्तित झाल्याचे दिसते. कलाकाराने अंतर्मुख होऊन अभ्यासायच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकल्या जात Ghazalvidha Sammelan) आहेत.”

डॉ. कैलास गायकवाड म्हणाले, “आपण सर्वजण मनोव्यापारी आहोत. भाषा विकसित झाल्यानंतर कलेची निर्मिती झाली. कला हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम असून साहित्यनिर्मितीला त्यामध्ये सर्वोच्च स्थान Ghazalvidha Sammelan) आहे.”

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गझलकारांनी सातत्याने वाचन करण्याबरोबरच इतरांना ऐकण्याची सवय जोपासावी, असे सांगितले. “स्वतःचे दु:ख मांडतानाच समाजाचे दु:खही शब्दांत उतरविणे आवश्यक आहे,” असे ते Ghazalvidha Sammelan) म्हणाले.

यावेळी प्राजक्ता पटवर्धन यांच्या ‘निव्वळ योगायोग’ या संग्रहाचा सन्मान कौशल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कौशल इनामदार यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. गझल स्पर्धेतील विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात Ghazalvidha Sammelan) आला.

संमेलनाचे संयोजन प्राजक्ता वेदपाठक, डॉ. स्नेहल कुलकर्णी, भूषण कटककर आणि जनार्दन म्हात्रे यांनी केले. प्राजक्ता पटवर्धन, वैशाली माळी, वैजयंती आपटे, निरुपमा महाजन, मुक्ता भुजबळे, जनार्दन म्हात्रे, डॉ. शिवाजी काळे, दास पाटील आणि अमिता पैठणकर यांचे सहकार्य Ghazalvidha Sammelan) लाभले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00