Home पुणे 10th 12th Exam2027:फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा; राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर

10th 12th Exam2027:फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा; राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर

दहावी परीक्षा वेळापत्रक २०२७, बारावी परीक्षा वेळापत्रक २०२७, महाराष्ट्र राज्य मंडळ, पुणे बोर्ड परीक्षा, SSC परीक्षा तारखा, HSC परीक्षा तारखा, प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक

by Admin
Spread the love

(पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले (10th 12th Exam2027)आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार(10th 12th Exam2027) आहेत.

बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते मंगळवार, १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, ११ मार्च २०२७ या कालावधीत घेण्यात येणार(10th 12th Exam2027) आहे.

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार (10th 12th Exam2027)आहेत.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, यासाठी लेखी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विषयवार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले (10th 12th Exam2027)आहे.

परीक्षेच्या तारखांबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले (10th 12th Exam2027)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00