Home माझं पिंपरी चिंचवड Teachers Day 2026:विद्यार्थी बनले एक दिवसाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम

Teachers Day 2026:विद्यार्थी बनले एक दिवसाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम

चिंचवडच्या प्रतिभा कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापकांची भूमिका पार पाडली.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. ६ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी प्राचार्य, उपप्राचार्य आणि प्राध्यापकांच्या भूमिका पार (Teachers Day 2026)पाडल्या. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडे विविध पदांचा पदभार सोपविण्यात (Teachers Day 2026)आला.

या उपक्रमात कु. मुस्कान शेख हिने एक दिवसाच्या प्राचार्या, तर कु. जेसिका शर्मा हिने उपप्राचार्याची भूमिका पार पाडली. तसेच ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध विभागांचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. विद्यार्थी प्राध्यापकांनी वर्गावर जाऊन तासिका घेतल्या, प्रात्यक्षिके घेतली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थी प्राचार्यांनी दिवसभर महाविद्यालयाचे प्रशासन, शिस्त आणि शैक्षणिक कामकाजाचे नियोजन (Teachers Day 2026)पाहिले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी प्राचार्या मुस्कान शेख म्हणाली, “एक दिवस जरी असला तरी प्राचार्यपदाची जबाबदारी किती मोठी आहे, हे आज समजले. प्राध्यापकांना वर्ग सांभाळताना किती मेहनत घ्यावी लागते, याचीही जाणीव झाली.” विद्यार्थी प्राध्यापकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त(Teachers Day 2026) केली.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, स्टाफ अकॅडमीच्या समन्वयिका डॉ. जयश्री कांबळे आणि प्रा. स्नेहल वऱ्हाडे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन विद्यार्थी प्राध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात (Teachers Day 2026)आला.

याप्रसंगी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी शिक्षकांचे महत्त्व विशद केले. मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “तुमच्यात आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती आदर हे गुण असतील, तर ते अंगीकारून भविष्यात शिक्षकी पेशा स्वीकारावा. कारण शिक्षक हा एक पिढी घडवत असतो. चांगल्या शिक्षकांची आजही समाजाला मोठी गरज आहे,” असे आवाहन त्यांनी (Teachers Day 2026)केले.

यावेळी नुकताच आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील डॉ. कविता गित्ते, सीमा शिंदे आणि कुंदा बच्छाव यांच्या कार्याचीही डॉ. कांकरिया यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना (Teachers Day 2026)दिली.

समारोपप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि गणेश वंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रियंका गंगावणे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी सरस्वती जोशी हिने केले, तर आभार विद्यार्थी उपप्राचार्या जेसिका शर्मा हिने मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित (Teachers Day 2026)होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00