Home महाराष्ट्र Petrol Diesel Hike :पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा आणखी एक धक्का; पेट्रोल ₹१११ पार, डिझेलही झपाट्याने महाग

Petrol Diesel Hike :पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा आणखी एक धक्का; पेट्रोल ₹१११ पार, डिझेलही झपाट्याने महाग

पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोल ₹१११.२१ तर डिझेल ₹९७.८३ प्रति लिटर. इंधन दरवाढीमुळे प्रवास, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तू महागण्याची भीती व्यक्त.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सोमवारी इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका दिवसात पेट्रोल तब्बल ₹२.७२ प्रति लिटरने महागले असून शहरात आता पेट्रोलचा दर ₹१११.२१ वर पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात ₹२.८१ ची वाढ होऊन तो ₹९७.८३ प्रति लिटर झाला (Petrol Diesel Hike) आहे.

 

आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखी ठरत आहे. खाद्यतेल, गॅस, दूध, भाज्या आणि किराणा मालाच्या वाढत्या किंमतींनंतर आता इंधन दरवाढीने घरगुती अर्थकारण आणखी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात (Petrol Diesel Hike )आहे.

 

रोजच्या प्रवासाचा खर्च वाढणार

 

पिंपरी-चिंचवड हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि आयटी हब मानले जाते. हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी, तळवडे, आकुर्डी, चिखली आणि पिंपरी परिसरात काम करणारे हजारो कर्मचारी रोज खासगी वाहनांवर अवलंबून (Petrol Diesel Hike )असतात.

 

पेट्रोलचे दर १११ रुपयांच्या पुढे गेल्याने आता रोजच्या प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. विशेषतः दुचाकीने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना महिन्याचा इंधन खर्च सांभाळणे अधिक कठीण होणार असल्याची चर्चा सुरू झाली(Petrol Diesel Hike ) आहे.

 

मालवाहतूक क्षेत्रावरही परिणाम

 

डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. ट्रक, टेम्पो आणि मालवाहतूक वाहनांचे ऑपरेटिंग खर्च वाढल्याने वाहतूकदारांकडून भाडेवाढीचे संकेत दिले जात (Petrol Diesel Hike )आहेत.

 

वाहतूक खर्च वाढल्यास त्याचा परिणाम थेट बाजारातील वस्तूंच्या किंमतींवर होणार असून भाजीपाला, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात (Petrol Diesel Hike )आहे.

 

नागरिकांमध्ये नाराजी

 

सततच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. “पगार तेवढाच राहतोय, पण रोजच्या गरजा दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया अनेक नोकरदारांकडून व्यक्त केली जात (Petrol Diesel Hike )आहे.

 

दरम्यान, इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक, कॅब सेवा आणि शाळा वाहनांच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत महागाईचा आणखी मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत (Petrol Diesel Hike )आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00