पिंपरी, दि. २५ मे २०२६ : “श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणे हीच उत्तम अभिवाचनाची खरी पोचपावती असते,” असे मत चिखली येथील प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे कार्यवाह यादवेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कॅप्टन कदम सभागृहात रविवारी (दि. २४ मे) रुद्रंग, निगडी-पुणे संस्थेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘लागले खूळ कलावंताला…’ या अभिवाचन मैफलीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत (Rudrang Marathi Literature) होते.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ आणि रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंडित किरण परळीकर यांनी, “संस्थेचा बारा वर्षांचा प्रवास म्हणजे एक तपश्चर्याच असून ते असिधारा व्रतासारखे असते,” अशा शब्दांत संस्थेचे कौतुक (Rudrang Marathi Literature)केले.
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर आणि गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष मैफलीची निर्मिती, संहिता आणि दिग्दर्शन रमेश यशवंत यांनी केले होते. कार्यक्रमात नागेश जोशी, उज्ज्वला केळकर, सागर यादव, किशोरी सरीन, अरुणा वाकनीस, डॉ. हेमंत हुईलगोळकर, स्मिता कुलकर्णी आणि रमेश वाकनीस यांनी मराठी, हिंदी आणि बंगाली भाषेतील निवडक अभिजात साहित्याचे प्रभावी अभिवाचन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध(Rudrang Marathi Literature) केले.
नटराज पूजन आणि ‘महाराष्ट्र देशा… मंगल देशा…’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राम गणेश गडकरी यांच्या ‘कवींचा कारखाना’ आणि ‘कविवर्य भांबूराव’ या विनोदी व उपहासात्मक लेखांच्या अभिवाचनातून शीघ्रकवींवरील मार्मिक भाष्याने श्रोत्यांना खळखळून (Rudrang Marathi Literature)हसवले.
तसेच नारायण सुर्वे यांच्या ‘मनीऑर्डर’, ‘मास्तर तुमचंच नाव लिवा’, शिल्पा देशपांडे यांच्या ‘भविष्यातील मुले’, सुरेश कोकीळ यांच्या रुबाया आणि मजरूह सुलतानपुरी यांच्या गझलेतून समाजातील वेदना, संघर्ष आणि भावविश्व प्रभावीपणे उलगडले. रमेश वाकनीस लिखित ‘आकाशा’ या दीर्घकवितेच्या लयबद्ध आणि गतिमान अभिवाचनाने उपस्थितांना अक्षरशः खिळवून(Rudrang Marathi Literature) ठेवले.
प्रसाद कुमठेकर यांच्या उदगिरी बोलीभाषेतील ‘बारकुल्या बारकुल्या गोष्टी’मधील ग्रामीण वास्तवाने अस्वस्थ करणारे चित्र उभे केले. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या ‘आमार प्राणेर माझे सुधा आछे…’ या बंगाली गीताचा मधुर नाद आणि त्यांच्या पत्नीच्या अंतर्मनातील वेदना व्यक्त करणारा मराठी अनुवाद रसिकांच्या मनाला (Rudrang Marathi Literature)भिडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुद्रंग आणि अनुसंधान कला संस्था परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता(Rudrang Marathi Literature) झाली.
