Home माझं पिंपरी चिंचवड IWC Nigd Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा आगळावेगळा उपक्रम; चिमुकले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जुळला स्नेहाचा सेतू

IWC Nigd Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा आगळावेगळा उपक्रम; चिमुकले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जुळला स्नेहाचा सेतू

आकुर्डी येथील मातृसेवा आश्रमात इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे चिमुकले आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणणारा आगळावेगळा सामाजिक उपक्रम पार पडला. भक्तिमय दिंडी, संवाद आणि समाजसेवेचा सुंदर संदेश देण्यात आला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. २६ जुलै २०२६): इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे आकुर्डी येथील मातृसेवा आश्रमात दोन पिढ्यांमधील स्नेह, प्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून महापालिका बालवाडीतील चिमुकले आणि आश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना भक्तिमय वातावरणात एकत्र आणत सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश देण्यात (IWC Nigd Pride)आला.

 

या उपक्रमात महापालिका बालवाडीतील २५ चिमुकले भगवान विठ्ठलाच्या वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात जवळील साई मंदिरात विठ्ठलाच्या गजराने झाली. त्यानंतर भक्तिमय दिंडीच्या स्वरूपात सर्वजण मातृसेवा आश्रमात पोहोचले. आश्रमात भगवान विठ्ठलाची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वितरण, मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न (IWC Nigd Pride)झाला.

 

यानंतर चिमुकल्यांनी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी प्रेमळ संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे आणि जिव्हाळ्याचे क्षण घालवले. मुलांच्या निरागस सहवासामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर दोन पिढ्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना अल्पोपहार देण्यात (IWC Nigd Pride)आला.

 

कुटुंबातील आनंदाचे क्षण समाजसेवेशी जोडत प्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने या उपक्रमातून (IWC Nigd Pride)केला.

 

या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या जीवनात प्रेम, माया आणि आनंदाचे क्षण निर्माण करणे, मुलांमध्ये ज्येष्ठांविषयी आदर, संवेदनशीलता आणि सहानुभूतीची भावना विकसित करणे, कौटुंबिक आनंद समाजसेवेद्वारे साजरा करण्याची प्रेरणा देणे आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करत इनर व्हीलच्या मैत्री व सेवाभावाच्या मूल्यांना अधिक बळकटी देणे, अशी (IWC Nigd Pride)होती.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00