Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Service Tax:झोपडपट्टीवासीयांचा सेवाकर भरण्याकडे वाढता कल; दोन महिन्यांत 13.81 लाखांची वसुली

PCMC Service Tax:झोपडपट्टीवासीयांचा सेवाकर भरण्याकडे वाढता कल; दोन महिन्यांत 13.81 लाखांची वसुली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने एप्रिल-मे 2026 मध्ये सेवाकरापोटी 13.81 लाख रुपये जमा केले. ऑनलाइन कर भरण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत पोहोचले

by Admin
Spread the love

पिंपरी | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आकारण्यात येणाऱ्या सेवा कराला झोपडपट्टीधारक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 मधील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नागरिकांनी सेवा करापोटी 13 लाख 81 हजार 869 रुपयांचा भरणा केला (PCMC Service Tax) आहे.

 

यामध्ये ऑफलाइन पद्धतीने 7 लाख 46 हजार 435 रुपये, तर ऑनलाइन माध्यमातून 6 लाख 35 हजार 434 रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, एकूण वसुलीपैकी जवळपास 50 टक्के कर ऑनलाइन भरला गेला असून नागरिकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल दिसून येत(PCMC Service Tax) आहे.

 

महापालिकेकडून महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच कर बिले वितरित केली जात असून कर भरण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. या उपक्रमांमुळे झोपडपट्टीवासीयांचा सेवाकर भरण्यातील सहभाग वाढल्याचे प्रशासनाने (PCMC Service Tax) सांगितले.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी झोपडपट्टीधारक नागरिक शहराच्या विकास प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होत असल्याचे सांगत त्यांच्या प्रतिसादाचे कौतुक केले. तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी डिजिटल करप्रणालीमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व नागरिकाभिमुख झाल्याचे नमूद (PCMC Service Tax) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00