Home गुन्हे Medical Shop Theft:चाकणमध्ये अजब चोरी! मेडिकलमधून कंडोम, कॅडबरी आणि झंडू बाम चोरीला

Medical Shop Theft:चाकणमध्ये अजब चोरी! मेडिकलमधून कंडोम, कॅडबरी आणि झंडू बाम चोरीला

महागडी औषधे सोडून चोरट्यांनी कंडोम, चॉकलेट्स आणि झंडू बामवर मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

by Admin
Spread the love

चाकणच्या खराबवाडी येथील माही मेडिकल दुकानात पहाटे अजब चोरीची घटना घडली. चोरट्यांनी महागडी औषधे सोडून कंडोम, कॅडबरी चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्स लंपास केले. सीसीटीव्ही फुटेज (Medical Shop Theft)व्हायरल.

प्रतिनिधी :चाकण परिसरातील खराबवाडी येथे घडलेल्या एका अजब चोरीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी महागडी औषधे न चोरता कंडोम, कॅडबरी चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्स लंपास केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत(Medical Shop Theft) आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील ‘माही मेडिकल’ या दुकानात पहाटे साडेचारच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि काही रोकडसह विविध साहित्य चोरून नेले. मात्र, दुकानातील महागडी औषधे तसेच इतर मौल्यवान वस्तूंना हात न लावता त्यांनी विशेषतः कंडोम, कॅडबरी चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्सच लक्ष्य केल्याचे समोर आले (Medical Shop Theft) आहे.

 

ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून येत (Medical Shop Theft)आहे.

 

या अनोख्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, नागरिकांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला (Medical Shop Theft) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00