Home तंत्रज्ञान Employment News:नवी सांगवी रोजगार मेळावा 2026 : 15,478 उमेदवारांच्या मुलाखती, 7 हजारांहून अधिकांना रोजगार संधी

Employment News:नवी सांगवी रोजगार मेळावा 2026 : 15,478 उमेदवारांच्या मुलाखती, 7 हजारांहून अधिकांना रोजगार संधी

नवी सांगवीत 120 कंपन्यांचा सहभाग; 15,478 युवकांच्या मुलाखती, 7 हजारांहून अधिकांना रोजगाराची संधी

by Admin
Spread the love

नवी सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित रोजगार मेळाव्यात 15,478 युवक-युवतींच्या मुलाखती पार पडल्या. 120 कंपन्यांमार्फत 7 हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध (Employment News) होणार.

पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा गुरुवारी (दि. १४ मे) नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. युवकांच्या हाताला रोजगार मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला मोठा प्रतिसाद (Employment News) मिळाला.

 

या मेळाव्यात तब्बल १५,४७८ युवक-युवतींनी नोंदणी केली असून, विविध १२० नामांकित कंपन्यांमार्फत उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या माध्यमातून ७ हजारांहून अधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी (Employment News)दिली.

 

कार्यक्रमात बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्य विकासाची जोड अत्यावश्यक झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्याची ताकद आपल्या युवाशक्तीत आणि त्यांच्या कौशल्यामध्ये (Employment News) आहे.”

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. रा. वराडे, महापालिका पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत (Employment News) झाले.

 

यावेळी आमदार जगताप यांनी पुण्याच्या वाढत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा उल्लेख करताना सांगितले की, “पुणे आज जागतिक स्तरावर ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून उदयास येत आहे. केंद्र सरकारकडून पुण्याच्या विकासासाठी ६ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. तसेच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक सुलभ झाला असून, हा प्रकल्प विकासाला गती देणारा ठरत (Employment News) आहे.”

 

राज्याच्या आर्थिक विकासात एमएसएमई आणि स्टार्टअप्सचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, “भारताच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा आहे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य अशा रोजगार मेळाव्यांतून केले जात (Employment News) आहे.”

 

उपायुक्त अनुपमा पवार यांनी युवकांना संयम, सातत्य आणि कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले. “तरुणांनी मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे. यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या युवकांसाठीच्या योगदानाचाही विशेष उल्लेख (Employment News) केला.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी युवकांना उद्योगांच्या अपेक्षेनुसार स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले. “केवळ नोकरी मिळवणे पुरेसे नसून ती टिकवून उत्कृष्ट कामगिरी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कुशल मनुष्यबळ असलेल्या भागांमध्ये उद्योग टिकून राहतात,” असे त्यांनी (Employment News) सांगितले.

 

कार्यक्रमात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोजकुमार मारकड आणि भारत मदने यांनी विशेष पुढाकार घेतला. सहभागी युवक-युवतींना विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सु. रा. वराडे यांनी (Employment News) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00