Home आरोग्य Nurse’s Day:प्राधिकरणात परिचारिका दिन उत्साहात साजरा; ज्येष्ठांसाठी आरोग्य मार्गदर्शन

Nurse’s Day:प्राधिकरणात परिचारिका दिन उत्साहात साजरा; ज्येष्ठांसाठी आरोग्य मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिक संघ व मधुमेह संघटनेचा संयुक्त उपक्रम; परिचारिकांचा सन्मान आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन

by Admin
Spread the love

प्राधिकरण, निगडी | प्रतिनिधी:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम उद्यानातील सभागृहात १४ मे २०२६ रोजी ‘परिचारिका दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राकेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित (Nurse’s Day) होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सौ. आशा नष्टे यांनी “हीच अमुची प्रार्थना” हे गीत सादर केले. यावेळी सर्व परिचारिका हातात मेणबत्त्या घेऊन कोरसमध्ये सहभागी झाल्याने वातावरण भावूक (Nurse’s Day)झाले.

 

प्रमुख अतिथींसह दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली, तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. शुभदा मेंगळे यांनी अतिथींचा परिचय करून (Nurse’s Day) दिला.

 

डॉ. राकेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारी हाडांची झीज, सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारांविषयी सविस्तर माहिती देत उपस्थितांच्या प्रश्नांनाही उत्तरे (Nurse’s Day) दिली.

 

सौ. आशा नष्टे यांनी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाला दिलेल्या २५ हजार रुपयांच्या देणगीवरील व्याजातून परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ. आशा नष्टे, माधुरी डिसोजा, विभावरी कोटस्थाने, पुष्पांजली सूर्यवंशी, पुष्पा लंके, अंजली कुलकर्णी आणि वत्सला वाघचौरे यांचा समावेश होता. सर्व परिचारिकांनी थोडक्यात मनोगत व्यक्त (Nurse’s Day) केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती इंगोले यांनी केले, तर नरेंद्र मिसाळ यांनी आभार प्रदर्शन(Nurse’s Day) केले.

 

यावेळी नगरसेविका शैलाताई मोरे, विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाची प्रार्थना आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता (Nurse’s Day) झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00