Home महाराष्ट्र The Ultimate Nutan:प्रतिभावंत नुतन : सहज सुंदर अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी सदाबहार अभिनेत्री

The Ultimate Nutan:प्रतिभावंत नुतन : सहज सुंदर अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी सदाबहार अभिनेत्री

देहप्रदर्शनाशिवाय केवळ अभिनय, भावमुद्रा आणि साधेपणाच्या जोरावर चार दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री

by Admin
Spread the love

“चला चला जाऊ सिनेमाला”

(देहप्रदर्शनाने नव्हे, तर आपल्या सहजसुंदर अभिनयाने चार दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री — नूतन)

“वो चाँद खिला, वो तारे हँसे,

ये रात अजब मतवाली है…

समझनेवाले समझ गये हैं,

ना समझे वो अनाड़ी (The Ultimate Nutan) है…”

 

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या, पण नूतन यांचे स्थान वेगळेच राहिले. साडीचा पदर ढळू न देता, कोणताही दिखाऊपणा न करता केवळ आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि सहज अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी साकारलेला प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांनी केवळ पाहिलाच नाही, तर पुन्हा पुन्हा (The Ultimate Nutan) अनुभवला.

 

स्त्रीचे सौंदर्य हे केवळ बाह्य रूपात नसून तिच्या साधेपणात आणि भावविश्वातही खुलते, हे नूतन यांनी आपल्या अभिनयातून सिद्ध (The Ultimate Nutan)केले.

 

‘तेरे घर के सामने’ या चित्रपटात त्यांचे नायक होते देव आनंद. सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेली या चित्रपटातील सर्वच गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून(The Ultimate Nutan) आहेत.

 

“दिल का भँवर करे पुकार,

प्यार का राग सुनो…”

 

मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत कुतुबमिनारवर चित्रित करण्यात आले होते. देव आनंद गाणे साकारत असताना नूतन यांनी केलेला हावभावांचा अभिनय अप्रतिम होता. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावना गाण्याला अधिक जिवंत करून (The Ultimate Nutan) जातात.

 

याच चित्रपटातील आणखी एक गीत—

 

“तेरे घर के सामने

एक घर बनाऊँगा…”

 

मदिरेच्या ग्लासात आपल्या प्रेयसीचे प्रतिबिंब पाहणारा नायक आणि त्या भावविश्वात हरवलेली प्रेक्षकांची मने… हे दृश्य आजही तितकेच मोहक (The Ultimate Nutan) वाटते.

 

ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अनाडी’ या चित्रपटाला अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले विरहगीत आजही मन हेलावून (The Ultimate Nutan) टाकते—

 

“तेरा जाना, दिल के अरमानों का लुट जाना…”

 

प्रेमभंगाची वेदना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणारी ही ओळ अनेकांच्या मनात कायमची घर करून (The Ultimate Nutan) राहिली.

 

याच चित्रपटातील मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आणखी एक गीत—

 

“दिल की नजर से, नजरों की दिल से

ये बात क्या है, ये राज क्या है…”

 

राज कपूर आणि नूतन यांच्या मनातील कोवळ्या प्रेमभावनांचा हा सुरेल संवादच जणू. कुठेही शृंगाराचा अतिरेक नाही; फक्त मनातल्या भावनांची नाजूक (The Ultimate Nutan) अभिव्यक्ती.

 

नूतन आणि सुनील दत्त यांचा ‘खानदान’ हा कौटुंबिक चित्रपटही तितकाच भावस्पर्शी ठरला. अपघातामुळे हात निकामी झालेल्या पतीच्या मनातील न्यूनगंड दूर करणारी पत्नी म्हणून नूतन यांनी साकारलेली भूमिका मनाला भिडणारी(The Ultimate Nutan) होती.

 

लग्नाच्या पहिल्या रात्री त्या गातात—

 

“तू ही मेरी मंदिर,

तू ही मेरी पूजा,

तू ही देवता हो…”

 

रवी यांच्या सुरेल संगीताला लता मंगेशकर यांच्या आवाजाची साथ लाभली आणि नूतन यांच्या अभिनयाने त्या गीताला अमरत्व प्राप्त (The Ultimate Nutan) झाले.

 

गीताच्या शेवटच्या ओळी—

 

“बहुत रात बीती, चलो मैं सुला दूँ,

पवन छेड़े सरगम, मैं लोरी सुनाऊँ…”

 

या ऐकताना प्रेक्षकही भावुक (The Ultimate Nutan) होतात.

 

‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटातील त्यांचे—

 

“मैं तो भूल चली बाबुल का देस…”

 

हे गीत प्रत्येक नववधूच्या मनातील भावना बोलके(The Ultimate Nutan) करते.

 

‘सीमा’ चित्रपटात बलराज साहनींसोबत काम करताना नूतन यांनी साकारलेली अंतर्मुख भूमिका विशेष गाजली. त्यातील प्रार्थना—

 

“तू प्यार का सागर है,

तेरी इक बूंद के प्यासे हम…”

 

आजही मनाला स्पर्शून (The Ultimate Nutan) जाते.

 

‘मिलन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेली गाणी तर रसिकांच्या कायम स्मरणात राहिली.

 

“सावन का महीना, पवन करे शोर…”

 

या गीतातील नूतन यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना पाहणे हीच एक पर्वणी(The Ultimate Nutan) होती.

 

‘दिल ने फिर याद किया’ या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या सोबत त्यांनी साकारलेले—

 

“कलियों ने घूँघट खोले…”

 

हे गीतही तितकेच(The Ultimate Nutan) गाजले.

 

नूतन यांच्या अभिनयातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना. त्या न बोलताही खूप काही सांगून जात. म्हणूनच त्यांचे असंख्य चित्रपट आजही रसिकांच्या मनात जिवंत (The Ultimate Nutan) आहेत.

 

नूतन यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीचा संपूर्ण वेध एका लेखात घेणे अशक्य आहे.

पुन्हा भेटू पुढच्या भागात अशाच एका प्रतिभावान (The Ultimate Nutan) कलाकारासोबत 

सुरेश कंक

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00