Home आरोग्य Hafkin Institute Pimpri :हाफकिनला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध : योगेश कदम

Hafkin Institute Pimpri :हाफकिनला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध : योगेश कदम

पिंपरीतील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची राज्यमंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली. अँटी-स्नेक व्हेनम उत्पादन वाढविण्यासह संस्थेच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश.

by Admin
Spread the love

पिंपरी : पिंपरी येथील ऐतिहासिक हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळास गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेतील औषध उत्पादन प्रक्रिया, सर्पालय तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी करून विविध कामकाजाचा आढावा घेतला. हाफकिन संस्थेला तिचे पूर्वीचे गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट (Hafkin Institute Pimpri )केले.

महामंडळाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तातडीने कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विशेषतः राज्यातील सर्पदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी (Hafkin Institute Pimpri )केल्या.

राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक किट उपलब्ध करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सर्पदंशाच्या उपचारासाठी वेळेत सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी (Hafkin Institute Pimpri )दिले.

प्रलंबित निधीसाठी मंत्रालयात विशेष बैठक

हाफकिन संस्थेच्या प्रलंबित निधीसह विविध विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले. संस्थेसाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट (Hafkin Institute Pimpri )केले.

तसेच हाफकिन संस्थेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही राज्यमंत्री कदम यांनी(Hafkin Institute Pimpri ) दिली.

या पाहणीप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हुकरे, हाफकिनचे महाव्यवस्थापक धीवर, पिंपरी विभाग व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुरहे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित (Hafkin Institute Pimpri )होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00