Home गुन्हे Digital Arrest Scam :डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची २.१४ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत

Digital Arrest Scam :डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची २.१४ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवडमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याची २ कोटी १४ लाखांची फसवणूक. सायबर पोलिसांनी राजस्थानमधून मुख्य आरोपीला अटक केली.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : निवृत्त बँक अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. राजेंद्र गणराज नागर (वय ३२, रा. जलखेडा, ता. नैनवा, जि. बुंदी, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या अथक तपासानंतर सायबर पोलिसांनी ही कारवाई (Digital Arrest Scam)केली.

‘PFI’ची भीती दाखवून बनावट पोलीस कागदपत्रांचा वापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निवृत्त बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. पीडित व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित रक्कम जमा झाल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर अटकेची भीती दाखवून मानसिक दबाव निर्माण करण्यात (Digital Arrest Scam)आला.

पैशांची पडताळणी केल्यानंतर संबंधित रक्कम परत करण्यात येईल, असे खोटे आश्वासन देण्यात आले. तसेच बनावट पोलीस नोटिसा आणि कागदपत्रांचा वापर करून पीडितांकडून वेगवेगळ्या सहा बँक खात्यांमध्ये तब्बल २ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम वर्ग करून घेण्यात आली. याप्रकरणी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Digital Arrest Scam)होता.

तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषणातून आरोपीचा माग काढला

गुन्ह्यातील आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक व आर्थिक विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी फसवणुकीतील सुमारे ४९ लाख २० हजार रुपये ‘M/s Sultan Construction and Material Suppliers’ या संस्थेच्या खात्यात जमा झाल्याचे आणि त्यानंतर ही रक्कम राजेंद्र नागर याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न (Digital Arrest Scam)झाले.

पोलिसांनी राजेंद्र नागर याला चौकशीसाठी नोटीस बजावली. मात्र, त्याने मोबाईल फोन बंद करून पोलिसांची दिशाभूल केली आणि तो फरार झाला. त्यानंतर संबंधित बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपीने स्वतः बँकेत जाऊन धनादेशाद्वारे संबंधित रक्कम काढल्याचे स्पष्ट (Digital Arrest Scam)झाले.

राजस्थानमध्ये शोधमोहीम राबवून अटक

आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यानंतर तो राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील लाखेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे पोलिसांना आढळून (Digital Arrest Scam)आले.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर ८ ऑगस्ट २०२६ रोजी राजेंद्र नागर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात (Digital Arrest Scam)आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अरविंद उर्फ राजा या साथीदाराच्या मदतीने फसवणुकीतून मिळालेल्या रकमेची विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू (Digital Arrest Scam)आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (Digital Arrest Scam)आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, प्रकाश कातकडे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग (Digital Arrest Scam)घेतला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00