Home प्रेरणा / यशकथा Pratibha International School :प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

Pratibha International School :प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने CBSE दहावी बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकालाची शानदार कामगिरी केली. ईशान गाडेकर 98.80 टक्क्यांसह प्रथम, अवनी मंडोत व मनस्वी मराठे द्वितीय क्रमांकावर.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. १७ : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने इयत्ता दहावी (CBSE) बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण (Pratibha International School) आहे.

 

या परीक्षेत ईशान गाडेकर याने ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याने इंग्रजी आणि आयटी विषयात १०० पैकी १०० गुण, तर सामाजिक शास्त्र विषयात ९९ गुण (Pratibha International School)मिळवले.

 

अवनी मंडोत आणि मनस्वी मराठे यांनी प्रत्येकी ९८ टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळवला. दोघींनीही इंग्रजी आणि आयटी विषयात १०० पैकी १०० गुण संपादन (Pratibha International School) केले.

 

निश्चल बडजाते याने ९७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. त्यानेही इंग्रजी आणि आयटी विषयात शंभर पैकी शंभर गुण (Pratibha International School) मिळवले.

 

शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रुद्र मंचेकर, तन्वी कापसे, वेदांत सुर्वे, आरुल महिंद्रकर, रघुवीर बिरादार, अन्विता चिंचोलीकर आणि प्रज्ज्वल रेखावर यांचा समावेश असून त्यांनी ९४.६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन (Pratibha International School) केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा तसेच विविध शिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राचार्या आणि संचालक यांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान आणि शिक्षकवृंदाचे अभिनंदन (Pratibha International School) केले.

 

शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात (Pratibha International School) आला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00