Home गुन्हे Spiritual Gurukul:आळंदीतील अध्यात्मिक गुरुकुल संस्थेत बालकांच्या छळाची तक्रार; २१ बालकांची निवारगृहात रवानगी

Spiritual Gurukul:आळंदीतील अध्यात्मिक गुरुकुल संस्थेत बालकांच्या छळाची तक्रार; २१ बालकांची निवारगृहात रवानगी

आळंदी येथील शिवछत्रपती अध्यात्मिक गुरुकुल संस्थेत बालकांच्या शारीरिक व मानसिक छळाची तक्रार चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत २१ बालकांना पुण्यातील निवारगृहात हलवले.

by Admin
Spread the love

आळंदी : आळंदी येथील एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेत बालकांचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची गंभीर तक्रार चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत एकूण २१ बालकांची पुण्यातील दोन निवारगृहात तात्पुरती रवानगी केली (Spiritual Gurukul) आहे.

 

दिनांक ८ मार्च २०२६ रोजी चाइल्ड हेल्पलाइनकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शिवछत्रपती अध्यात्मिक गुरुकुल संस्था येथे काही अनुचित प्रकार घडत असल्याची माहिती मिळाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी भेट देऊन तेथील बालकांची स्वतंत्रपणे विचारपूस(Spiritual Gurukul) केली.

 

प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे तसेच काही अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले. यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि आळंदी पोलीस यांनीही संस्थेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा(Spiritual Gurukul) घेतला.

 

दरम्यान, बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी बालकल्याण समितीच्या आदेशानुसार संस्थेतील एकूण २१ बालकांपैकी ६ बालकांना ‘साथी’ संस्थेत, तर १५ बालकांना ‘साई सेवा’, पुणे येथे तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले (Spiritual Gurukul)आहे.

 

सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, संबंधित संस्थेबाबत प्रशासनाकडून पुढील आवश्यक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली (Spiritual Gurukul)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00