Home गुन्हे Vikas Lawande:विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; आळंदीत धक्काबुक्की, संग्राम महाराज भंडारेंवर आरोप

Vikas Lawande:विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; आळंदीत धक्काबुक्की, संग्राम महाराज भंडारेंवर आरोप

पुणे जिल्ह्यातील आळंदी मातोबा येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक आणि धक्काबुक्की. संग्राम महाराज भंडारे व समर्थकांवर आरोप, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप केला (Vikas Lawande) आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी मातोबा येथे आयोजित कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे परतत होते. आज सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप (Vikas Lawande)आहे.

 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संग्राम महाराज भंडारे यांनी, “वारकरी संप्रदायावर टीका करताना ‘घुसखोर’ असा शब्द वापरणे चुकीचे होते,” असे (Vikas Lawande) म्हटले.

 

घटनेनंतर विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. “माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. आरोपींवर कारवाई होईपर्यंत मी पोलीस ठाण्यात सत्याग्रह करणार,” असे त्यांनी (Vikas Lawande) सांगितले.

 

दरम्यान, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात (Vikas Lawande) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00