पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्र. १५, सेक्टर २८, गंगानगर प्राधिकरण परिसरातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील प्लॉट क्रमांक ५७६ वरील नीलिमा वैद्य यांच्या इमारतीवरील मोबाईल टॉवरच्या खाली अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली (Ganganagar Fire News) होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत तत्परतेने आणि धाडसाने परिस्थिती हाताळत आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता राखली (Ganganagar Fire News)गेली.

घटनेची माहिती कळताच भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि त्यांचे सहकारी सागर घोरपडे यांनी त्वरित अग्नीशामक दलाला बोलावून घेतले.अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे मोठे नुकसान टळले. जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धावून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे परिसरातील नागरिकांनी मनापासून आभार मानले असून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले जात (Ganganagar Fire News)आहे.
