पिंपरी-चिंचवड : कोणताही महागडा क्लास न लावता, केवळ जिद्द, चिकाटी आणि स्वबळावर अभ्यास करत यूपीएससीसारख्या देशातील सर्वोच्च परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात १२५ वा क्रमांक मिळवणाऱ्या कबीर राहुल कांबळे याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजमेरा-मासूळकर कॉलनी परिसरात राहणाऱ्या कबीरच्या घरी जाऊन आमदार अमित गोरखे यांनी त्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन (UPSC 125 rank) केले.
यावेळी आमदार गोरखे म्हणाले की, “कबीरने मिळवलेले हे यश सामान्य बुद्धिमत्तेचे नसून, त्याच्या असामान्य मेहनतीची आणि संघर्षाची पावती आहे. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सुशिक्षित समाज कबीरच्या रूपाने आकाराला येत (UPSC 125 rank)आहे.”
घरातूनच अभ्यास, स्वबळावर यश
आजच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून विद्यार्थी विविध क्लासेसचा आधार घेतात. मात्र, कबीरने कोणत्याही महागड्या क्लासशिवाय घरातूनच नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश मिळवले. दिवसाचे अनेक तास अभ्यासाला देत त्याने स्वतःची स्वतंत्र अभ्यासपद्धती विकसित(UPSC 125 rank) केली.
विशेष म्हणजे, कबीर हा केवळ अभ्यासातच नव्हे तर कलाक्षेत्रातही तितकाच रस घेणारा ‘मल्टिटॅलेंटेड’ विद्यार्थी आहे. त्याला गिटार वाजवण्याची विशेष आवड असून, अभ्यासाच्या तणावातही त्याने आपली ही कला जपली(UPSC 125 rank) आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे फळ
यावेळी आमदार अमित गोरखे भावूक होत म्हणाले की, “कबीरच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि पाठबळ मोठे आहे. आजच्या तरुणांनी यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे समाजसेवेसाठी पुढे येणे, ही काळाची गरज आहे. सुशिक्षित, संवेदनशील आणि कर्तृत्ववान समाज निर्माण होणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली(UPSC 125 rank) ठरेल.”
कबीरच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देताना आमदार गोरखे यांनी विश्वास व्यक्त केला की, “कबीर हा केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज बनून काम (UPSC 125 rank) करेल.”
कबीरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (UPSC 125 rank) आहे.
