Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Additional charge:पिंपरी-चिंचवड महापालिकेत वित्त विभागात बदल; प्रमोद भोसले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

PCMC Additional charge:पिंपरी-चिंचवड महापालिकेत वित्त विभागात बदल; प्रमोद भोसले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

पिंपरी चिंचवड महापालिकेत वित्तीय अनियमिततेच्या चौकशीदरम्यान प्रवीण जैन यांना सक्तीची रजा, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार प्रमोद भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला

by Admin
Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वित्त विभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले (PCMC Additional charge) आहेत.

 

आदेशानुसार, सन २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये करण्यात आलेल्या वाढ-घट, बिल अदायगी आणि मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ९ एप्रिल २०२६ रोजी समिती गठित करण्यात आली (PCMC Additional charge) आहे .

 

प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून चौकशी निष्पक्ष व पारदर्शक राहावी यासाठी विद्यमान मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले (PCMC Additional charge) आहे.

 

दरम्यान, चौकशी प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडू नये आणि कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी प्रमोद भोसले यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले(PCMC Additional charge) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00