प्रतिनिधी: निगडी प्राधिकरण परिसरातील रहिवासी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हरित सेतू प्रकल्पाविरुद्ध तीव्र विरोध व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या गरजा, परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांची वास्तविक स्थिती यांचा विचार न करता महापालिकेकडून हा प्रकल्प जबरदस्तीने राबविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या अनावश्यक आणि खर्चिक प्रकल्पामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असून परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, अनधिकृत पथारीवाल्यांचे वाढते अतिक्रमण आणि पर्यावरणीय संकट निर्माण होत असल्याचे निदर्शनास (Environmental Hazard) आले आहे.
फुटपाथांचे अतिविस्तारीकरण आणि वाहनमार्गांचे आकुंचन यामुळे पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वृक्षतोड आणि पर्यावरणाचा घातक परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचेही तक्रारीत म्हटले (Environmental Hazard) आहे.
नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली, महापालिकेशी चर्चा करण्याची मागणी केली, समन्वय साधण्याचे प्रयत्न केले; तरीसुद्धा कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी, महापालिकेने नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून कामे घाईघाईने आणि चुकीच्या पद्धतीने सुरू ठेवली आहेत. मोठ्या रस्त्यांवर झालेल्या कामांनंतर आता छोटे रस्ते देखील या प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांची स्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे दिसत(Environmental Hazard)आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संघटित होऊन आपला आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुषंगाने, ३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा चौक (आनंद हॉस्पिटल) येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शन व आंदोलन आयोजित केले जाणार आहे. परिसरातील रहिवासी, सामाजिक संस्था, धार्मिक संघटना, राजकीय कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्व नागरिकांना या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याची विनंती(Environmental Hazard) करण्यात आली आहे.
सामूहिक दबावामुळे प्रशासनाला हा प्रकल्प तातडीने थांबवावा आणि नागरिकांच्या वास्तविक गरजेनुसार सुधारित आराखडा तयार करावा, अशी नागरिकांची मुख्य मागणी आहे. आंदोलनाद्वारे नागरिकांचा संदेश स्पष्ट केला जाईल की, हरित प्रकल्प म्हणजेच फक्त बांधकामाचा विषय नाही; तर हा परिसरातील रहिवाशांच्या जीवनशैली, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करणारा उपक्रम(Environmental Hazard) आहे.
