भारताने रांचीत दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोमांचक विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रांचीतील JSCA स्टेडियममध्ये खेळलेल्या सामन्यात भारताने ३४९ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सुरुवातीला मोठा झटका दिला. हर्षित राणाने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच मागे धरले. मार्करम (७) आणि रिकल्टन (०) यांनी फारशी कामगिरी केली नाही, तर अनुभवी क्विंटन डिकॉक (०) लवकर बाद झाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ विकेटवर १७ धावा अशी ( Ranchi ODI Match) झाली.
या संकटातून दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीने काही वेळेस सामना रंगात आणला. मैथ्यू ब्रीजके (७२) आणि टोनी डि जॉर्जी (३९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करून संघाला काही आधार दिला, तसेच डेवाल्ड ब्रेविस (३७) ने देखील ( Ranchi ODI Match) सहकार्य केले.
पुढे नंबर सात मार्को जानसेन (७०) आणि नंबर आठ कॉर्बिन बॉश (६७ धावा, ५१ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार) यांनी धमाका करत सामना जवळपास तुल्यबळ केला. शेवटच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज होती, मात्र प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या चेंडूवर बॉशचा झेल रोहित शर्मा कडे दिल्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. भारताने ४ बॉल शिल्लक राहून सामना १७ धावांनी( Ranchi ODI Match) जिंकला.
गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या, हर्षित राणाने ३, अर्शदीपने २ तर प्रसिद्ध कृष्णाने १ विकेट घेतला. भारतासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने १३५ धावांचे शतक झळकावले आणि त्यांनी ११ चौकारे व ७ षटकार मारले. कोहलीने रोहित शर्मा (५७) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने ३४९ धावांचा ( Ranchi ODI Match)मजबूत स्कोर उभारला.
सलामीवीर यशस्वी जायसवाल (१८) लवकर बाद झाला, पण त्यानंतर रोहित-कोहलीच्या जोडीने भारतासाठी पिचवर ठोस पाया तयार केला. दक्षिण आफ्रिकेच्या यानसन, नांद्रे बर्गर, कॉर्बिन बॉश आणि बार्टमन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट ( Ranchi ODI Match) घेतले.
सामन्याचा शेवट अत्यंत थरारक होता, तरी भारताची अनुभवसिद्ध आणि युवा गोलंदाजी कामी आली. भारताने मालिकेत चांगली सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहली यांची कामगिरी आणि कुलदीप यादवची फिरकी सामना ( Ranchi ODI Match) निर्णायक ठरली.
विवेक कुलकर्णी


