Home क्रीडा India’s Biggest Victory:९ वर्षांनंतर फॉलो-ऑन; भारताचा अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी ऐतिहासिक विजय, मानव सुतार सामनावीर

India’s Biggest Victory:९ वर्षांनंतर फॉलो-ऑन; भारताचा अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी ऐतिहासिक विजय, मानव सुतार सामनावीर

भारताने अफगाणिस्तानचा डाव आणि 300 धावांनी पराभव करत कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. ९ वर्षांनंतर फॉलो-ऑन देत भारताने विक्रम रचला. पदार्पणवीर मानव सुतारने 7 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.

by Admin
Spread the love

चंदीगड (विवेक कुलकर्णी ) : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इतिहास रचत डाव आणि तब्बल 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत निर्विवाद वर्चस्व गाजवत अवघ्या तीन दिवसांत सामना संपवला. हा विजय भारताच्या कसोटी इतिहासातील डावाच्या फरकाने मिळालेला सर्वात मोठा विजय (India’s Biggest Victory)ठरला.

 

विशेष म्हणजे भारतीय संघाने तब्बल नऊ वर्षांनंतर कसोटीत प्रतिस्पर्धी संघाला फॉलो-ऑन दिला. यापूर्वी २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे भारताने फॉलो-ऑन लागू केला होता. त्यानंतर प्रथमच भारतीय संघाने हा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे यशस्वी(India’s Biggest Victory) ठरला.

 

भारतीय संघाने पहिल्या डावात 127 षटकांत 8 बाद 564 धावा करून डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलने 126 धावांची शानदार खेळी करत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. के. एल. राहुलने शतक झळकावत डावाचा भक्कम पाया रचला, तर साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी 81 धावांचे मोलाचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरच्या उपयुक्त खेळीमुळे भारताची धावसंख्या आणखी भक्कम (India’s Biggest Victory)झाली.

 

564 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 152 धावांत आटोपला. या डावाचा नायक ठरला पदार्पणवीर मानव सुतार. राजस्थानच्या 23 वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूने आपल्या पहिल्याच कसोटीत 33 धावांत 6 विकेट्स घेत अफगाण फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला 412 धावांची प्रचंड आघाडी मिळाली आणि फॉलो-ऑन देण्याचा निर्णय घेण्यात(India’s Biggest Victory) आला.

 

फॉलो-ऑननंतरही अफगाणिस्तानची फलंदाजी भारतीय फिरकीसमोर निष्प्रभ ठरली. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली, तर कुलदीप यादवने 3 बळी घेत अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112 धावांत गुंडाळला. परिणामी भारताने डाव आणि 300 धावांनी विक्रमी विजयाची नोंद (India’s Biggest Victory)केली.

 

मानव सुतारचे स्वप्नवत कसोटी पदार्पण

या सामन्याचा सर्वात मोठा नायक ठरला तो मानव सुतार. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पहिल्या डावात 6/33 अशी कामगिरी करत त्याने 21 व्या शतकात भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम (India’s Biggest Victory)नोंदवला.

 

याशिवाय आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्याच षटकात विकेट घेणारा तो 21 व्या शतकातील टिनू योहानननंतरचा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. पदार्पणाच्या डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो भारताचा दहावा गोलंदाज(India’s Biggest Victory) बनला.

 

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेणारा मानव सुथार हा भारताचा केवळ ८वा गोलंदाज ठरला आहे. भारतीय क्रिकेटच्या जवळपास ८० वर्षांच्या इतिहासात हा दुर्मिळ पराक्रम मोजक्याच गोलंदाजांना साध्य झाला (India’s Biggest Victory) आहे.

पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच षटकात विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

क्र. गोलंदाज विरोधी संघ वर्ष
मोंटू बॅनर्जी वेस्ट इंडिज १९४८
मनोहर हर्डीकर वेस्ट इंडिज १९५८
वामन कुमार पाकिस्तान १९६१
चेतन शर्मा पाकिस्तान १९८४
डब्ल्यू. व्ही. रमण वेस्ट इंडिज १९८८
निलेश कुलकर्णी श्रीलंका १९९७
टिनू योहानन इंग्लंड २००१
मानव सुथार अफगाणिस्तान २०२६

मानव सुथारची ऐतिहासिक कामगिरी

अफगाणिस्तानविरुद्ध चंदीगड येथे झालेल्या कसोटीत मानव सुथारने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात अब्दुल मलिकला बाद करत इतिहास रचला. तब्बल २५ वर्षांनंतर हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज (India’s Biggest Victory) ठरला.

याचबरोबर संपूर्ण सामन्यात त्याने ७ बळी घेत भारताच्या दणदणीत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याचे पदार्पण भारतीय क्रिकेटच्या संस्मरणीय कामगिरींपैकी एक मानले जात(India’s Biggest Victory) आहे.

विशेष उल्लेख

निलेश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत अनोखा विक्रम केला होता. आजही ते कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे एकमेव भारतीय गोलंदाज (India’s Biggest Victory) आहेत.

क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पदार्पण अत्यंत दुर्मिळ मानले जाते आणि मानव सुथारने केलेली ही कामगिरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एका सुवर्ण पानाची नोंद ठरली(India’s Biggest Victory) आहे.

मानव सुतारने संपूर्ण सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आणि त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात विकेट, सामन्यात 7 विकेट्स आणि सामनावीर पुरस्कार अशी दुर्मिळ कामगिरी करणारा तो भारतीय क्रिकेटमधील मोजक्या खेळाडूंमध्ये सामील(India’s Biggest Victory) झाला.

 

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवे पर्व

 

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघ नव्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलने कर्णधार म्हणून शतक झळकावत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फलंदाज आणि नेता या दोन्ही भूमिकांमध्ये त्याने आपली छाप (India’s Biggest Victory)उमटवली.

 

भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय

 

या विजयासह भारताने २०१८ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच नोंदवलेल्या डाव आणि 262 धावांच्या विजयाचा विक्रम मागे टाकला. डाव आणि 300 धावांच्या फरकाने मिळालेला हा विजय भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी तब्बल 15 विकेट्स घेत अफगाणिस्तानला पूर्णपणे शरणागती पत्करायला भाग (India’s Biggest Victory)पाडले.

 

अफगाणिस्तानविरुद्धच्या या दिमाखदार विजयाने भारतीय संघाने नव्या कसोटी पर्वाची दमदार सुरुवात केली असून शुभमन गिलचे नेतृत्व, मानव सुतारचे स्वप्नवत पदार्पण आणि वॉशिंग्टन सुंदरची प्रभावी गोलंदाजी ही या ऐतिहासिक विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये (India’s Biggest Victory) ठरली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00