पिंपरी : “कामगार हा केवळ आपल्या जबाबदाऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो नेहमी संस्थेच्या हिताचाही विचार करत असतो. मात्र बदलते कायदे कामगारांच्या हिताचे नसल्याने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला अधिक संघर्ष करावा लागतो. आज कामगार चळवळीत अनेक प्रवाह निर्माण झाल्यामुळे वैचारिक संघर्ष वाढला असून त्यामुळे चळवळ दुर्बळ झाली आहे. सत्याग्रही मार्गाने चळवळ चालवणे कठीण झाले आहे. समाजकारण आणि राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत समाजाला विधायक ऊर्जा देणाऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी (Ulhasdada Pawar) केले.
पिंपरी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित कार्यक्रमात एच. ए. कामगार लढ्याची यशोगाथा सांगणाऱ्या ‘गाथा संघर्षाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांच्या आत्मकथनावर आधारित हे पुस्तक दादाभाऊ गावडे यांच्या लेखणीतून साकार झाले असून त्याचे प्रकाशन उल्हासदादा पवार यांच्या हस्ते करण्यात (Ulhasdada Pawar)आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, मानव कांबळे, डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप पवार, मारुती भापकर आदी मान्यवर उपस्थित(Ulhasdada Pawar) होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. कैलास कदम यांनी(Ulhasdada Pawar) केले.
कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतात कामगार चळवळीतील सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उद्याच्या पिढीला संघर्षाची आणि अस्तित्वाच्या लढ्याची जाणीव व्हावी, यासाठी हे आत्मकथन पुस्तक रूपाने अर्पण केल्याचे त्यांनी (Ulhasdada Pawar) सांगितले.
लेखक दादाभाऊ गावडे म्हणाले, “कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.”कॉ. अजित अभ्यंकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही आपल्या मनोगतात कामगार चळवळीची सद्यस्थिती, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर प्रकाश(Ulhasdada Pawar) टाकला.
कार्यक्रमाला सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, राजेंद्र घावटे, विजय लोखंडे, तात्यासाहेब शितोळे, विजय पाटील, अनिल रोहम, संभाजी शिंदे आदींची उपस्थिती(Ulhasdada Pawar) होती.
कार्यक्रमाचे संयोजन संदीप तापकीर, डॉ. सीमा काळभोर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, रामभाऊ सासवडे, दामोदर वहिले, तेजस्विनी देशमुख आदींनी(Ulhasdada Pawar) केले.
सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी(Ulhasdada Pawar) केले.
