पिंपरी-चिंचवड – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेण्यात आली असून, खड्ड्यांमुळे जर जीवितहानी झाली तर संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा कडक(Pothole Accident Action) निर्णय घेण्यात आला आहे.
आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेशातील रस्त्यांची विद्यमान अवस्था, वाहतूक कोंडी, सुरु असलेली कामे आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होत असल्याने तातडीने कारवाईची आवश्यकता(Pothole Accident Action) असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
बैठकीतले विशेष मुद्दे
रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावेत.
डिसेंबर २०२५ पूर्वी PMRDA हद्दीत खड्डेविरहित रस्त्यांची हमी द्यावी.दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई तसेच ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व तपासणी पथके वाढवावीत.नागरिकांनी दिलेल्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण होईल याची खात्री (Pothole Accident Action)प्रशासनाने ठेवावी.
याशिवाय, रस्ते दुरुस्ती, वाहतूक सुधारणा आणि खड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित महापालिका, एमआयडीसी, पोलीस विभाग आणि वाहतूक विभाग यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी एक संयुक्त अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात(Pothole Accident Action )आली.
हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर आणि PMRDA हद्दीतील इतर गर्दीच्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दुरुस्ती कामात विलंब किंवा निष्काळजीपणा आढळल्यास तातडीची कारवाई केली जाईल, (Pothole Accident Action)असेही स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे सुरक्षा व वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील रस्त्यांची स्थिती लक्षणीय सुधारेल, (Pothole Accident Action)अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
