पिंपरी, दि. १७ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पुणे येथील एका कार्यक्रमानिमित्त आले असता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शहरातील चारही आमदारांचे त्यांनी अभिनंदन (Devendra Fadnavis)केले.
यावेळी आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. “आपण सर्वांनी एकत्रितपणे अत्यंत चांगले यश संपादन केले आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास आपल्या कामातून सार्थ ठरवा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी (Devendra Fadnavis)दिल्या.
तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी (Devendra Fadnavis)दिले.
“आता अधिक जोमाने कामाला लागा, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि जनतेची कामे प्रभावीपणे पूर्ण करा,” असा संदेश देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील चारही आमदारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा (Devendra Fadnavis) दिल्या .
