पिंपरी | दि. १८ जानेवारी २०२६:“नारायण सुर्वे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय. जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे दत्तात्रय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत; मात्र सरकारने त्यांच्या कार्याकडे कधीच संवेदनशील दृष्टीने पाहिले नाही,” अशी खंत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त (Dr Shripal Sabnis) केली.
ते नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनात बोलत होते. हे संमेलन जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर, कनेरसर (ता. खेड, जि. पुणे) येथे शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ व स्वागताध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती(Dr Shripal Sabnis) होती.
याप्रसंगी जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच
अश्विनी गोरे – पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान
संजीवनी डोंगरे – मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे सन्मान
लालासाहेब जगदाळे – पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार
रोहिणी दौंडकर – पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षकप्रतिभा पुरस्कार
कवी संदीप वाघोले – पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार
यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संतोष गाढवे यांच्या ‘मातीतून उगवलेल्या कविता’ आणि आकाश भोरडे यांच्या ‘झालं बाटुकाचं जिणं’ या साहित्यकृतींना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात (Dr Shripal Sabnis) आला.
त्यापूर्वी संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, प्रभाकर वाघाले, रजनी कानडे तसेच सन्मानार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करत प्रभावी काव्यजागर सादर केला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “प्रयोगशील, कृतिशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या दत्तात्रय वारे यांनी केवळ तीन विद्यार्थी उरलेल्या शाळेची पटसंख्या वाढवून एका वर्षात तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ‘वारे पॅटर्न’ राबविण्यात (Dr Shripal Sabnis) यावा.”
अॅड. सतीश गोरडे यांनी, “वारे सरांची शाळा हे कनेरसर गावाचे भूषण आहे,” असे गौरवोद्गार काढले.डॉ. विठ्ठल वाघ यांनी, “या डोंगराळ व उजाड भागात वारे गुरुजींनी शिक्षणाचे नंदनवन फुलवले आहे,” अशी प्रशंसा करत उपस्थितांच्या आग्रहास्तव ‘काळ्या मातीत मातीत…’ ही आपली सुप्रसिद्ध कविता सादर (Dr Shripal Sabnis) केली.
सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय वारे म्हणाले, “मराठी शाळा सक्षम झाल्या तर मराठी भाषेची चिंता करण्याची गरज भासणार नाही.”
लालासाहेब जगदाळे यांनी, “मराठी शाळा कुठेही कमी नाहीत,” असा विश्वास व्यक्त(Dr Shripal Sabnis) केला.
बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांच्या ‘डोंगरी शेत माझं गं…’ या नारायण सुर्वे लिखित कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविकात अरुण गराडे यांनी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून हा त्यातील चौथा पुष्प असल्याची माहिती दिली.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी संवाद साधला. इंद्रजित पाटोळे व प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चिटणीस यांनी केले तर राजू जाधव(Dr Shripal Sabnis) यांनी आभार मानले.
