Home आरोग्य Pipeline Accident:पिंपरी-चिंचवड : पाईपलाईन फुटल्याने नागरिकांमध्ये घबराट, एक जखमी

Pipeline Accident:पिंपरी-चिंचवड : पाईपलाईन फुटल्याने नागरिकांमध्ये घबराट, एक जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये एमएनजीएलची पाईपलाईन फुटल्याने मोठी दुर्घटना टळली. दगड उडून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. सीसीटीव्हीत घटना कैद.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक घटना घडली. पाईपलाईन फुटताच मोठ्या प्रमाणात दगड व माती हवेत उडाली, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ (Pipeline Accident) उडाला.

 

याच वेळी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर दगड लागून तो जखमी झाला. सुदैवाने त्याची जखम किरकोळ असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी (Pipeline Accident)दिली.

 

या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत सुरक्षित ठिकाणी आश्रय(Pipeline Accident) घेतला.

 

सदर पाईपलाईन ही एमएनजीएल कंपनीची असून त्याद्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. पाईपलाईन टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत (Pipeline Accident)आहे.

 

या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटनांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत (Pipeline Accident)आहे.

 

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर काही क्षण काय घडले हेच समजले नाही. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि गणेश लंगोटे यांनीही या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली (Pipeline Accident)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00