प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पात्रात अतिक्रमणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय परिसरात “खेळाचे मैदान” उभारण्याच्या नावाखाली नदीपात्रात मातीचा भराव टाकणे, वृक्षतोड करणे आणि नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला (Pavana River Encroachment) आहे.
भापकर यांच्या माहितीनुसार, नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणावर माती टाकून भराव केला जात असून त्यामुळे पवना नदीचे पात्र अरुंद होत आहे. यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झाडांच्या बुंध्यांवर माती टाकून लहान झाडांसह त्यांना गाडले जात असल्याचेही निदर्शनास आले(Pavana River Encroachment) आहे.
या प्रकारामुळे नदीकाठावरील जैवविविधता धोक्यात आली असून पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक झाडांची थेट तोड होत असल्याचाही आरोप करण्यात आला(Pavana River Encroachment) आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात येत असून, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत (Pavana River Encroachment)आहे.
