देहूरोड/प्रतिनिधी:देहूरोड परिसरात २९ एप्रिल रोजी घडलेल्या भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, आज त्यांची घटनास्थळी धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यासोबतच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला (Dehuroad Murder Case) आहे.
घटनेचा थरार:
२९ एप्रिल रोजी देहूरोडमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने परिसर हादरला होता. चार हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्यावर प्रथम गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मावळ तालुका आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली (Dehuroad Murder Case) होती.
पोलीसांची जलद कारवाई:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत देहूरोड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि तपासाच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात यश (Dehuroad Murder Case)आले.
घटनास्थळी धिंड:
ज्या परिसरात आरोपींनी दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तात आरोपींना नेण्यात आले. यावेळी आरोपींची धिंड काढण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात (Dehuroad Murder Case)आहे.
दरम्यान, या हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात (Dehuroad Murder Case)आहे.
