(पिंपरी-चिंचवड, दि. २१ जून २०२६) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी (२१ जून) शहरातील १४ मंडळांमार्फत १४ विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून जगभरात योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, त्याच संकल्पनेला पुढे नेत शहरात व्यापक जनसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत (International Yoga Day) आहे.
या योग शिबिरांमध्ये हजारो नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रसार करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश (International Yoga Day)आहे.
यमुनानगर-तळवडे, आकुर्डी-शाहूनगर, भोसरी-कृष्णानगर, संत तुकाराम नगर, वाकड-थेरगाव, रहाटणी-पिंपळे सौदागर, दिघी-भोसरी, चिंचवड-काळेवाडी, चिंचवड प्राधिकरण, मोशी-चऱ्होली, तळवडेवस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर, पिंपरी-फुगेवाडी-बोपखेल, सांगवी-पिंपळे गुरव तसेच रावेत-वाल्हेकरवाडी या भागांमध्ये एकाच वेळी योग दिनाचे कार्यक्रम होणार असून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार (International Yoga Day) आहे.
भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाला आज जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा प्रभावी मार्ग बनला आहे. वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि विविध आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. याच उद्देशाने शहरातील अधिकाधिक नागरिकांनी योगाशी जोडले जावे, हा भाजयुमोचा प्रयत्न (International Yoga Day) आहे.
याबाबत माहिती देताना भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव म्हणाले, “योग ही भारताने जगाला दिलेली महान देणगी आहे. प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी, सक्षम आणि सशक्त भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित सर्व योग शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी (International Yoga Day) व्हावे.”
‘निरोगी युवा – सशक्त भारत’ हा संदेश देत भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराने आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी हा पुढाकार घेतला असून, योगाविषयी जनजागृती आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त (International Yoga Day) केला.
