Home गुन्हे Illegal Construction Demolition:PCMC ची चिखली-कुदळवाडीमध्ये मोठी कारवाई; ४ हजार चौ.फुट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

Illegal Construction Demolition:PCMC ची चिखली-कुदळवाडीमध्ये मोठी कारवाई; ४ हजार चौ.फुट अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील ४,३३६.२८ चौ.फुट अनधिकृत बांधकामांवर मोठी निष्कासन कारवाई केली. १० जेसीबी, १० पोकलेन आणि १२०० पोलिसांचा सहभाग.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ४ हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात (Illegal Construction Demolition) आली.

 

कारवाईदरम्यान कुदळवाडी येथील विसावा चौक ते पोलीस चौकी मार्गावरील गट क्रमांक ७०० मधील अनधिकृत पत्राशेड, जाधववाडी रस्त्यावरील अनधिकृत वीट बांधकाम व पत्राशेड, कुदळवाडी पोलीस चौकीजवळील गट क्रमांक ६७८ मधील अनधिकृत आरसीसी बांधकाम तसेच सावता माळी मंदिर रस्ता, जाधववाडी येथील अनधिकृत पत्राशेड हटविण्यात (Illegal Construction Demolition) आले.

 

ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार (Illegal Construction Demolition) पडली.

 

कारवाईत बांधकाम परवानगी विभागाचे १२ उपअभियंते, ४ कनिष्ठ अभियंते, २४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), धडक कारवाई पथकातील ८ क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सुमारे १२०० अधिकारी व कर्मचारी आणि २१८ एमएसएफ जवान सहभागी झाले (Illegal Construction Demolition) होते.

 

या मोहिमेसाठी १० पोकलेन, १० जेसीबी, ५० मजूर, ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रशासनाला सहकार्य  (Illegal Construction Demolition) केले.

 

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे उभारू नयेत. नियमबाह्य बांधकामांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला सहकार्य (Illegal Construction Demolition)करावे.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00