पिंपरी-चिंचवड : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील सक्रिय कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात (BJP Yuva Morcha) आले.
आदित्य कुलकर्णी हे यमुनानगर, निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि युवकांमधील प्रभावी जनसंपर्क लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली (BJP Yuva Morcha) आहे.
नियुक्तीनंतर आदित्य कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत शहरातील युवा उद्योजकांना एकत्र आणणे, त्यांना संघटित करणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या उद्योगविषयक योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे (BJP Yuva Morcha)सांगितले.
त्यांच्या निवडीमुळे यमुनानगर, निगडी परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत(BJP Yuva Morcha) आहे.
