Home माझं पिंपरी चिंचवड Ajit Pawar Pcmc:प्रभाग २८ मधील ज्येष्ठ नागरिकांशी अजित पवार यांचा थेट संवाद | पिंपळे सौदागर

Ajit Pawar Pcmc:प्रभाग २८ मधील ज्येष्ठ नागरिकांशी अजित पवार यांचा थेट संवाद | पिंपळे सौदागर

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत विकासकामे, वाहतूक, पाणीपुरवठा व नागरिक सुविधांबाबत भूमिका मांडली.

by Admin
Spread the love

पिंपळे सौदागर (प्रतिनिधी) :पिंपळे सौदागर परिसराच्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागाला असेच विकासाभिमुख नेतृत्व दिले आहे. ही निवडणूक राष्ट्रीय राजकारणाची नसून, स्थानिक प्रश्न सोडवू शकणाऱ्या नेतृत्वाची निवड आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar Pcmc) यांनी केले.

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, उमेश काटे, शीतल काटे व मीनाक्षी काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Ajit Pawar Pcmc)होते.

नाना काटे यांच्या कार्याचा गौरव करत अजित पवार म्हणाले की, पिंपळे सौदागरला विकास क्षेत्र म्हणून ओळख मिळवून देण्यात नाना काटे यांचे मोठे योगदान आहे. विकासकामांसोबतच नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणजे खरे नेतृत्व असून नाना काटे यांनी ते सातत्याने सिद्ध केले (Ajit Pawar Pcmc)आहे.

हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीपासून परिसराच्या विकासाचा पाया घातला गेला असून, आपल्या भागाचे नेतृत्व निवडताना कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद (Ajit Pawar Pcmc) केले.

वाहतूक कोंडीवर ठोस उपाय

नाशिक फाटा–जगताप डेअरी मार्गावरील पिके चौक, कोकणे चौक आणि शिवार चौक येथे अंडरपास व उड्डाणपुलांची काही कामे मंजूर झाली असून उर्वरित कामांसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी (Ajit Pawar Pcmc)दिली.

कुंजीर चौक–रक्षक चौक रस्ता

मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याची कबुली देत, हा रस्ता खुला करण्यासाठी निवडणुकीनंतर ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट (Ajit Pawar Pcmc) केले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

देशभरातून येथे वास्तव्यास आलेल्या कुटुंबांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी (Ajit Pawar Pcmc)केली.

सांस्कृतिक भवन उभारणी

बस डेपोच्या सुमारे ३.५ एकर जागेवर बहुउद्देशीय सभागृह उभारून ते नागरिकांसाठी सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी (Ajit Pawar Pcmc)सांगितले.

पाणीपुरवठा व पर्यावरण संवर्धन

पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प आणि प्रभागात उभारलेल्या तीन मोठ्या जलसाठा टाक्यांमुळे पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त (Ajit Pawar Pcmc)केला.

२०११–१२ मध्ये लावलेल्या हजारो वड-पिंपळ वृक्षांबरोबरच साडेतीन किलोमीटरचा लिनियर अर्बन गार्डन हा या परिसरासाठी महत्त्वाचा पर्यावरणीय उपक्रम असल्याचे त्यांनी (Ajit Pawar Pcmc)सांगितले.

पर्यटन व क्रीडा सुविधा

नाना काटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सेव्हन वंडर्स’ गार्डनमुळे हा परिसर पर्यटनाचे आकर्षण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच चार एकर जागेत योगा पार्क, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि जगातील सर्वात उंच क्लाइंबिंग वॉल उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती (Ajit Pawar Pcmc) दिली.

नाना काटे म्हणजे खरे लोकनायक”

कोविड काळातही २४x७ नागरिकांसाठी उपलब्ध राहून काम करणारे नेतृत्व म्हणजे नाना काटे, असे सांगत अजित पवार म्हणाले की, प्रचारापेक्षा अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीला तत्काळ धावून जाणारे नेतृत्व म्हणजेच खरे लोकनायक असून नाना काटे यांच्या रूपाने पिंपळे सौदागरला ते लाभले आहेत.शहर स्वच्छ, स्मार्ट, प्रदूषणमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त आणि पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी (Ajit Pawar Pcmc) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00