Home माझं पिंपरी चिंचवड Jijavu Vyakhyanmala 2026:जिजाऊ व्याख्यानमाला 2026 : 26 एप्रिलपासून पाच दिवसीय व्याख्यानमालेला प्रारंभ

Jijavu Vyakhyanmala 2026:जिजाऊ व्याख्यानमाला 2026 : 26 एप्रिलपासून पाच दिवसीय व्याख्यानमालेला प्रारंभ

पिंपरीतील गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमाला 26 एप्रिलपासून सुरू. पाच दिवस विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, पुरस्कार सोहळाही (Jijau Vyakhyanmala 2026)होणार.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ : गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा प्रारंभ रविवार, २६ एप्रिलपासून होत आहे. ही व्याख्यानमाला चिंचवडगाव येथील चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक येथे दररोज सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली (Jijau Vyakhyanmala 2026) आहे.

यंदा व्याख्यानमाला ३६व्या वर्षात पदार्पण करत आहे. रविवारी, २६ एप्रिल रोजी अमृता चांदोरकर ‘जे मागाल ते मिळेल’ (मनातील लहरी कशा काम करतात?) या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. सोमवारी, २७ एप्रिल रोजी प्रा. डॉ. संजय चौधरी ‘संतांच्या संगती’ या विषयावर मार्गदर्शन (Jijau Vyakhyanmala 2026) करतील.

मंगळवारी, २८ एप्रिल रोजी संदीप तापकीर ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयावर विचार मांडतील. बुधवारी, २९ एप्रिल रोजी डॉ. सागर देशपांडे ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावर तर गुरुवारी, ३० एप्रिल रोजी डॉ. भावार्थ देखणे ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विषयावर अंतिम व्याख्यान (Jijau Vyakhyanmala 2026)देतील.

समारोपाच्या दिवशी चिंतामणी, क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळाही पार पडणार(Jijau Vyakhyanmala 2026) आहे.

ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी(Jijau Vyakhyanmala 2026) केले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00