Home प्रेरणा / यशकथा Vishwamangal Marathi Foundation:आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ:आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य सोहळा संपन्न

Vishwamangal Marathi Foundation:आळंदी येथे “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा दिमाखदार शुभारंभ:आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य सोहळा संपन्न

आळंदी येथे विश्वमंगल मराठी फाउंडेशनचा भव्य शुभारंभ पार पडला. मराठी भाषा, संस्कृती, शाळा व उद्योगांना जागतिक व्यासपीठ देण्याचा संकल्प.

by Admin
Spread the love

आळंदी (ता. १ मे २०२६) : मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण आणि उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”चा भव्य शुभारंभ आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यभरातून तसेच देश-विदेशातून आलेल्या उद्योजक व मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती (Vishwamangal Marathi Foundation)होती.

 

या सोहळ्यास आमदार सुभाष बापू देशमुख (सोलापूर), प्रख्यात वक्ते व ज्येष्ठ निरुपणकार विवेकजी घळसासी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ईशवेद बायोटेक प्रा. लि.चे संजय वायाळ, लंडनस्थित वैज्ञानिक डॉ. उदय भोसले आणि दुबई येथील उद्योजक आप्पासाहेब कोंढारे हे विशेषतः उपस्थित(Vishwamangal Marathi Foundation) होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे महापूजन करून करण्यात आली. त्यानंतर मंदिरापासून सभागृहापर्यंत वारकऱ्यांच्या सहभागातून दिंडी काढण्यात आली. सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. यावेळी फाउंडेशनचा लोगो व अधिकृत वेबसाईटचे अनावरणही करण्यात (Vishwamangal Marathi Foundation)आले.

प्रास्ताविकात आमदार सुभाष बापू देशमुख यांनी फाउंडेशन स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करत “लोकल टू ग्लोबल” आणि “ग्लोबल टू लोकल” या संकल्पनांवर भर दिला. मराठी शाळा, उद्योजक आणि संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी (Vishwamangal Marathi Foundation)केले.

 

यावेळी विवेकजी घळसासी यांनी देशमुख यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत “लोकमंगल ते विश्वमंगल” या त्यांच्या २८ वर्षांच्या कार्यप्रवासाचा गौरव केला. मराठी भाषा, संस्कार आणि कुटुंबव्यवस्था जपत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित(Vishwamangal Marathi Foundation) केली.

 

कार्यक्रमात परदेशातून आलेल्या उद्योजकांच्या सहभागातून परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात नवउद्योजकांना जागतिक संधी, उद्योगवृद्धीचे मार्ग आणि नवकल्पनांविषयी मार्गदर्शन करण्यात (Vishwamangal Marathi Foundation)आले.

 

पंढरपूर ते आळंदी अशी सायकलवारी करत फाउंडेशनचा सामाजिक संदेश पोहोचवणाऱ्या सायकल्स क्लब, पंढरपूरच्या सायकलवीरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच युवा भारूडकार कृष्णाई उळेकर यांनी सादर केलेल्या “बुरगुंड” या समाजप्रबोधनात्मक भारूडाने कार्यक्रमात रंगत (Vishwamangal Marathi Foundation)आणली.

 

फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळा दत्तक घेणाऱ्या उद्योजकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच आळंदी येथे फाउंडेशनची पहिली स्थानिक समिती स्थापन करण्यात आली असून सदस्यांचा सन्मान करण्यात(Vishwamangal Marathi Foundation) आला.

 

कार्यक्रमाचा समारोप भक्तिभावपूर्ण वातावरणात ‘पसायदान’ गाऊन करण्यात आला. “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक विकासासाठी व्यापक स्तरावर कार्य होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त (Vishwamangal Marathi Foundation)केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00