संत तुकारामनगर (सुरेश कंक ): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकारामनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त “कामगारांचे सामाजिक जीवन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले (Labour Day) होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार प्रकाश घोरपडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव शिर्के, ह. भ. प. शामराव गायकवाड, ह. भ. प. यादव तळोले, शंकर नानेकर तसेच कामगार कल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कारळे आदी मान्यवर उपस्थित(Labour Day) होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘गरजा महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तीगीताने झाली. कवी शामराव सरकाळे यांनी सादर केलेल्या कवितेने कार्यक्रमात उत्साह निर्माण(Labour Day) केला.
यावेळी तानाजी एकोंडे म्हणाले, “कष्टकरी कामगार हा राष्ट्रीय प्रवाहातील मूळ आधारस्तंभ आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे योगदान अनमोल आहे. त्यामुळे कामगारांच्या श्रमाचे मोल जपणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या अस्थिर आणि तणावपूर्ण परिस्थितीत औद्योगिक केंद्रे आणि श्रमिक जगत स्थिर राहिले, तर सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील. यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होणे गरजेचे (Labour Day)आहे.”
सुरेश कंक आणि प्रकाश घोरपडे यांनीही आपल्या मनोगतातून कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य (Labour Day)केले.

प्रदीप मरळ, शैलजा आवडे आणि संगीता क्षीरसागर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख अनिल कारळे यांनी केले, तर आभार केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी (Labour Day)मानले.
